Last Updated: Thursday, March 15, 2012, 17:02
www.24taas.com, सांगली सांगली मिरज रोडवर आज इंजिनिअरिंग कॉलेडच्या बसवर झाड कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात आष्टा येथील अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेजचे तीन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झालेत.
मृतांमध्ये एका मुलीचा समावेश आहे. गणेश प्रयाग, अमित मासळ आणि आसावरी कांबळे अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. जखमींवर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मध्यरात्री अज्ञातानं झाड पेटवल्यामुळे आज सकाळी हे झाड अचानक बस वर कोसळले. तब्बल तीन तास अथक प्रयत्न करुन सदर बस बाजूला काढण्यात आली.
या अपघातामुळे तीन तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेन आणि अग्निशमन विभागाच्या सहाय्यानं बसमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढले. रस्त्यालगतच्या झाडांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेकडे आहे. मात्र, या दोन्ही विभागाच्या निष्काळजीपणामुले निष्पाप विद्यार्थ्यांचा आज जीव गेला आहे.
First Published: Thursday, March 15, 2012, 17:02