Last Updated: Sunday, March 18, 2012, 13:03
www.24taas.com, पुणे पुण्यातील तळेगाव परिसरात एका तरूणीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी दोन आरोपांना अटक करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर २००७ ला हिंजवडीतल्या ‘विप्रो’त काम करणाऱ्या ज्योतीकुमारी चौधरी हिला कंपनीची गाडी नेण्यासाठी आली होती. त्यानंतर या तरूणीवर तळेगाव परिसरात बलात्कार करण्यात आला आणि तिची हत्या करण्यात आली.
या प्रकरणी ड्रायव्हर पुरूषोत्तम बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडे यांना अटक करण्यात आली आहे. या बलात्कार प्रकरणानं देशभरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
First Published: Sunday, March 18, 2012, 13:03