Last Updated: Sunday, November 13, 2011, 11:18
झी २४ तास वेब टीम, पुणे 
पुणे पोलिसांनी ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पुन्हा जेरबंद केलं. मात्र आरोपीला पुन्हा पकडताना तीन पोलीस गंभीर जखमी झाले. सिद्धराम बंगलुरे या आरोपीला विजापूर कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस पुण्याला परतत होते. प्रवासात आरोपीनं पोलीस बेसावध असताना गाडीतून उडी घेतली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनीही कोणताही विचार न करता उडी घेतली. यामध्ये तीन पोलीस गंभीर जखमी झाले.
आपल्या जीवाची बाजी लावत तीनही पोलिसांनी या बदमाश गुंडाला जेरबंद करण्यात यश मिळवलं. परंतु या झटापटीमध्ये ते मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. शौर्य बजावणाऱ्या हनुमंत मिसाळ, श्रीनाथ कांबळे आणि विकास फुले यांना पोलीस खात्याकडून बक्षीसानं गौरवण्यात येणार आहे.
First Published: Sunday, November 13, 2011, 11:18