Last Updated: Sunday, March 18, 2012, 09:33
www.24taas.com, तळेगाव-दाभाडे 
मुंबई पुणे जुन्या महामार्गावर तळेगाव-दाभाडे इथे गॅस टँकर उलटला. गॅस गळतीने हानी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील दुकाने बंद करण्यात आली आहेत. तसेच जुन्या महामार्गावरील वाहतूक नवीन एक्सप्रेसवर वळवण्यात आली. टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
First Published: Sunday, March 18, 2012, 09:33