Last Updated: Monday, March 19, 2012, 15:36
www.24taas.com, पुणे 
वडार समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत मंत्रालयावर पायी मोर्चा काढला आहे. पुण्याहून शनिवारी निघालेल्या या मोर्चात ८ ते १० हजार कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. जुन्य़ा मुंबई- पुणे हायवेवरुन हा मोर्चा पुढे सरकतो आहे.
दोन दिवसापासून कोणीही वडार समाजाच्या मागण्याची दखल न घेतल्यानं हा मोर्चा एक्सप्रेस वे वर जावून रास्ता रोकोचा इशारा दिल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या इशाऱ्यानंतर एक्सप्रेस वे वर पोलिस बंदोबस्त क़डक करण्यात आला होता.
दरम्यान एक्सप्रेस वे वर जावू न दिल्यास जुन्या हायवेवर ठिय्या आंदोलनाचा इशारा मोर्चेकऱ्यानी दिल्यानं पोलिसांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली. पण काही आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
First Published: Monday, March 19, 2012, 15:36