Last Updated: Monday, March 19, 2012, 16:48
www.24taas.com, कोल्हापूर ऊस शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायम असल्याने शेतकरी चिंतेत आहे. या शेतकऱ्याला आधार देण्याचा प्रयत्न सरकारने केले आहे. ऊसाचे संपूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने बंद होणार नाहीत असे आश्वासन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळाला आहे.
राज्यात साडेसहाशे लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झालंय. एप्रिल अखेरपर्यंत सर्व गाळप पूर्ण होईल. मात्र तोवर कोणताही कारखाना बंद होणार नाही असं पाटील यांनी सांगितले. यंदा सुमारे साडेसातशे लाख मेट्रीक टन गाळप होण्याची शक्यता पाटील यांनी वर्तवलीय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ऊस शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही देखील पाटील यांनी दिली आहे.
अनेकवेळा ऊसाचे पिक घेऊनही शेतकऱ्याला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पिक घेऊन दु:खी होतो. तसेच कर्जबारी होत असतो. त्यामुळे तो शेतीकरूनही पिचतो. त्यामुळे हा सरकारचा निर्णय दिलासा देणारा आहे.
First Published: Monday, March 19, 2012, 16:48