पुण्याच्या मंडईला वेश्यांचा विळखा - Marathi News 24taas.com

पुण्याच्या मंडईला वेश्यांचा विळखा

 www.24taas.com, पुणे
 
पुण्याच्या ऐतिहासिक महात्मा फुले मंडईला वेश्यांचा विळखा पडलाय. मंडईत महिला राजरोसपणे देहविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी फिरतायत. ग्राहक मंडईत जाण्याचं टाळतायत तर व्यापा-यांना व्यवसाय करणंही कठीण बनलं आहे.
 
पुण्याच्या ऐतिहासिक महात्मा फुले मंडई आणि हेरिटेज दर्जा असलेल्या वास्तूला वेश्यांचा विळखा पडला आहे. दिवसा-ढवळ्या अशा मंडईत फे-या मारत किंवा कोप-या-कोप-याला थांबुन या देहविक्री करणा-या महिला आपला ग्राहक शोधतात आणि त्यांना ग्राहकही मिळतात. पण याचा मोठा फटका इथं भाजी विकायला बसणा-यांना आणि व्यापा-यांना बसतोय. कारण या कारणामुळे सामान्य गृहिणी आता मंडईत जाऊन भाजी घेणं टाळतायत.
 
मंडईतील व्यापा-यांनी या प्रकाराविरोधात स्थानिक पोलीस आणि महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत पण ना पोलीस ना पालिका प्रशासनाने याची दखल घेतली. त्यामुळे आता यातून मंडईला कोण वाचवणार हा भाजीविक्रेत्यां सोबतच भाजी खरेदी करायला जाणा-यांनाही प्रश्न पडला आहे.
 
 
 

First Published: Tuesday, March 20, 2012, 21:34


comments powered by Disqus