Last Updated: Wednesday, March 21, 2012, 10:09
www.24taas.com, कोल्हापूर 
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून ४ उमेदवार इच्छुक आहेत. यामध्ये राजकीय नेत्यांच्याच नव्या पिढीचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांपैकी एकही जण माघार घेण्यास तयार नसल्यामुळे अध्यक्षपदामधील चुरस वाढली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या वारसदारांचीच निवडणूक ठरते आहे. खासदार सदाशिवराव मंडलिकांचे पुत्र संजय मंडलिक, विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिकांचे पुत्र अमल महाडिक, माजी आमदार बजरंग देसाईंचे पुत्र राहुल देसाई, तसंच कार्यकर्ते हिंदूराव चौगुले अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यापैकी कुठल्याही उमेदवाराची माघार घेण्याची तयारी नाही.
पक्षानं संधी दिल्यास चांगलं काम करण्याचा विश्वास इच्छुकांनी व्यक्त केला आहे. इच्छुकांची संख्या वाढल्यानं पक्षाची चांगलीच गोची झाली आहे. पक्षाचा आदेश मानणार असं इच्छुक उमेदवार म्हणत असतील तर मग मुलाखतीचा फार्स केवळ औपचारिकतेसाठीच की काय? असा प्रश्न विचारण्यात येतो आहे.
First Published: Wednesday, March 21, 2012, 10:09