Last Updated: Saturday, March 24, 2012, 14:33
www.24taas.com, सोलापूर समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी झटणा-या आणि प्रसिद्धी परान्मुख राहिलेल्या व्यक्तींना देण्यात येणारा सारडा समान संधी पुरस्कार यंदा हिमाचल प्रदेशच्या सत्र या संस्थेचे संस्थापक सुभाष मेंढापूरकर यांना जाहीर झाला आहे.
सुभाष मेंढापूरकर सोसायटी फॉर सोशल अपलिफ्ट थ्रु रुरल ऍक्शन या संस्थेचे संस्थापक आहेत. पुरस्काराचं यंदाचं हे बारावं वर्ष आहे. सात लाख ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हिमाचल प्रदेशातल्या दुर्गम भागातील घटस्फोटीत विधवा, अत्याचारित निराधार महिलांच्या विकासासाठी गेल्या तीन दशकांपासून सुभाष मेंढापूरकर यांच्या सत्र या संघटनेचं मोठं योगदान आहे.
सोलापूरमध्ये जन्मलेल्या मेंढापूरकरांनी विद्यापीठातून कम्युनिटी डेव्हलपमेंट विषयातून पदव्यूत्तर पदवी मिळवली. १९७७मध्ये त्यांनी सूत्र या संस्थेची स्थापना केली. लिंगभेद विरहित समाजाची स्थापना हे ध्येय घेऊन सत्र ही संस्था कार्यरत आहे. २८ मार्चला मुंबईत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणारेए. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांताकुमार हेही उपस्थित राहणार आहेत.
First Published: Saturday, March 24, 2012, 14:33