Last Updated: Tuesday, March 27, 2012, 19:19
दीपक शिंदे, www.24taas.com, कोल्हापूर कोल्हापूर जवळच्या संभापूर गावात गावातील लोकांनी एकत्र येऊन उत्कृष्ट कलाकुसर असलेलं मंदिर बांधलं. आता मात्र मंदिरातील देवाच्या पूजेचा मान कोणाचा यावरून मोठा वाद निर्माण झालाय. त्यामुळं मंदिरच बंद आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील टोप संभापूरमध्ये गावकऱ्यांनी बिरदेवाचं सुरेख मंदिर बांधलं. मात्र पूजेच्या मान कुणाचा यावरून मानपान सुरु आहे. त्यामुळं सुरुवातीपासून एकत्र असलेले विठ्ठल आणि संपत कारंडे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून मंदिर बंद आहे. भाविक लांबूनच नमस्कार करतात.
आता गावातील या वादात राजकारण घुसलंय आणि दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झालेत.विठ्ठल कारंडे आपला मान सोडायला तयार नाहीत तर त्यांना एकट्यालाच मान कसा द्यायचा असं दुसऱ्या गटाचे लोक म्हणतात. प्रशासनानही वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातही समझोता होईना. आता ज्यांनी राजकारण केलं, ते तरी हा वाद मिटविणार का ? जेणेकरून जे पांथस्थ रस्त्यावरूनच देवाला नमस्कार करून मार्गस्थ होतात त्यांना देवदर्शन घडेल.
First Published: Tuesday, March 27, 2012, 19:19