Last Updated: Thursday, November 17, 2011, 07:43
झी २४ तास वेब टीम, पुणे पुण्यातल्या मारुती नवलेंचे नवनवे कारनामे पुढं येत आहेत. मारुती नवलेंनी महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या नोटीशींना केराची टोपली दाखवल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. सिंहगड इन्स्टिट्युटला सील ठोकण्यात आले आहे.
वडगाव बुद्रुकमधल्या सिंहगड इन्स्टिट्युटमधल्या लायब्ररी, लॅब आणि स्विमिंग पूलचा प्रॉपर्टी टॅक्स न भरल्यामुळं महापालिनं या इन्सिट्टुयटला सील ठोकलंय. नवलेंच्या सिंहगड इन्सिट्टुयटनं गेल्या तीन वर्षांपासून तीन कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकवलाय.
First Published: Thursday, November 17, 2011, 07:43