सांगली बँकेचे संचालक मंडळ बरखास्त - Marathi News 24taas.com

सांगली बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

www.24taas.com, सांगली
 
सांगली जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची वसुली करण्यात अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
 
कर्ज वसुली न झाल्याने नाबार्डने ही कारवाई केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसल्याचं मानण्यात येत आहे. बँकेच्या अध्यक्षपदी दोन दिवसांपूर्वीच दिनकर पाटील यांची निवड झाली होती.
 
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय. कामातील अनियमिततेमुळे नाबार्डनं ही कारवाई केलीय. कामातील अनियमिततेमुळं ही ही कारवाई करण्यात आलीय. नाबार्डच्या या कारवाईमुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा वर्षांच्या सत्तेला हादरा बसलाय. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या दिनकर पाटलांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
 
मात्र लगेचंच नाबार्डनं संचालक मंडळ बरखास्त केल्यानं मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय. बँकेनं अनेक साखर कारखान्यांना कर्ज दिले असून त्यांची वसुली करण्यात बँकेला अपयश आलंय. मात्र राजकीय दबावामुळं कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.  मात्र अखेर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून सहकार खात्याचे अधिकारी शैलेश कोथमीरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
 

 
 
 

First Published: Tuesday, April 3, 2012, 11:52


comments powered by Disqus