पुणेकरांसाठी 'निर्जळी' उन्हाळा! - Marathi News 24taas.com

पुणेकरांसाठी 'निर्जळी' उन्हाळा!

नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे
 
उन्हाळा आणि पाणी टंचाईनं हैराण झालेल्या पुणेकरांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. एक वेळच्या पाणीपुरवठ्याबरोबरच आता आठवड्यातून एक दिवस संपूर्ण पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.
 
पुणेकरांवरचं पाणीसंकट आणखी तीव्र झालंय. १ मार्चपासून पुण्यात एकाच वेळी पाणीपुरवठ्याची घोषणा करण्यात आली. त्यात आता आठवड्यातला एक संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. महापालिकेनं १ मार्चपासून पाणीकपात केलीच नाही, असा ठपका जलसंपदा विभागानं ठेवलाय. त्यामुळे आता पुणेकरांना साडे तीन महिने फक्त ३ टीएमसी पाण्यावर काढावे लागणार आहेत.
 
जलसंपदानं डिसेंबरपासून दिलेले पाण्यासंदर्भातले आकडे दिशाभूल करणारे असल्याचा आरोप होतोय. तसंच पिण्यासाठी पाणी न देता फक्त शेतीला पाणी देणं कितपत योग्य आहे, असा सवाल विचारला जातोय. पुण्याला पाणी देण्यासाठी बांधील असलेले महापालिकेचे नेते आणि अधिकारी आता मात्र तोंड लपवत आहेत. त्यामुळेच पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात मोठ्या पाणीसंकटाला सामोरं जावं लागणार आहे.

First Published: Thursday, March 29, 2012, 20:24


comments powered by Disqus