करणीच्या भीतीने पत्नीचा खून - Marathi News 24taas.com

करणीच्या भीतीने पत्नीचा खून

www.24taas.com, पुणे
 
करणीच्या भीतीनं एका माथेफिरुनं आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. गुरुवार पेठेत राहणाऱ्या विक्रम रसाळेनं आपल्या पत्नीचे चावे घेऊन आणि भिंतीवर डोके आपटून खून केलाय. अंगात शनी संचारलाय आणि आपला खून होणार असल्याच्या भीतीनं विक्रम दोन दिवस घरात बसून होता. याच अवस्थेत त्यानं पत्नी स्वातीचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विक्रमनं हे कृत्य केल्यानं सर्वांना धक्का बसलाय.
 
स्वातीच्या घरच्यांचा आणि परिसरातील लोकांना मात्र वेगळाच संशय आहे. विक्रम मानसिक रुग्ण असल्याची किंवा करणी झाल्याचं नाटक करत असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येतोय.
 
दरम्यान, तंत्रमंत्र...भूतबाधा...या विषयी समाजात पुरातन काळा पासून सुरु असलेल्या अघोरी रुढी परंपरा आजही पहायला मिळतात. आपल्या अवती भवती दिवसेन दिवस अधंश्रध्देला बळी पडण्याऱ्यांची संख्य़ा वाढतांनाच दिसते आहे.
 

First Published: Thursday, March 29, 2012, 21:27


comments powered by Disqus