कोल्हापूरकर 'गॅस'वर - Marathi News 24taas.com

कोल्हापूरकर 'गॅस'वर

दीपक शिंदे, www.24taas.com, कोल्हापूर
 
कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या संपामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळं नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.
 
महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश आणि गोवा या राज्यातील गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचा २२ मार्चपासून संप सुरू आहे. त्याचा थेट परिणाम गॅस वितरणावर होतोय. कोल्हापूरात गॅस वितरण कार्यालयाबाहेर सिलिंडरसाठी रोज रांगा दिसून येत आहेत. वाहनधारकांचा संप लवकर मिटला नाही तर समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता गॅस वितरकांनी व्यक्त केली आहे.
 
आधीच महागाईनं जनता त्रस्त झाली आहे. त्यातच अत्यावश्यक असणाऱ्या गॅसच्या टंचाईमुळे कोल्हापूरकर कमालीचे वैतागले आहेत. ही परिस्थिती असतानाच सरकारनं गॅसदरवाढ जाहीर केल्यानं गृहीणींचं घरखर्चाचं बजेट कोलमडण्याची वेळ आली आहे.

First Published: Friday, March 30, 2012, 21:00


comments powered by Disqus