पुण्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीतला वाद मिटला - Marathi News 24taas.com

पुण्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीतला वाद मिटला

www.24taas.com, पुणे
 
पुणे महापालिकेतील विषय समित्यांच्या अध्यक्ष पदावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रंगलेला वाद अखेरच्या क्षणी मिटला. त्यामुळे श़हर सुधारणा समितीचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या चेतन तुपेला मिळालय. त्याबदल्यात विधी समितीचं अध्यक्षपद काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना मिळालंय.
 
तर महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मीनल सरवदे यांची अध्यक्षपदी निवड झालीये. तर क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी अविनाश बागवे यांची निवड झाली आहे.
 
यात शहर समितीच्या अध्यक्ष पदावरुन तणाव निर्माण झाला होता. या चारही समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी अर्ज भरला होता. पण काँग्रेसनं माघार घेतल्यानं  पुणे महापालिकेतली आघाडी बचावली.

First Published: Friday, March 30, 2012, 22:18


comments powered by Disqus