पुण्यात विद्यार्थ्याची केली मित्रानींच हत्या - Marathi News 24taas.com

पुण्यात विद्यार्थ्याची केली मित्रानींच हत्या

www.24taas.com, पुणे
 
पुण्यात एका पंधरा वर्षी विद्यार्थ्याची हत्या त्याच्या मित्रांनी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोसरीतील प्रियदर्शनी इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या शुभम शिर्केचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली. शुभमला काल दुपारी त्याच्या मित्रांनी फोन करुन बोलावून घेतलं. त्यानंतर त्यांनी त्याला दिघी येथे नेऊन त्याची हत्या केली.
 
शुभमचे मित्र एवढे निर्ढावलेले होते की त्यापैकी अक्षय भगत या त्याच्या मित्राने त्याच्या वडिलांकडे ५०,००० रुपयांची खंडणी मागितली. शुभमच्या वडिलांनी १५,००० दिले तरीही तो घरी परत न आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर शुभमचा मृतदेह आढळून आला. किशोरवयीन मुलांमध्ये वाढता हिंसाचार आणि गुन्हेगारी वाढत चाललेलं प्रमाण यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येतं आहे.

 
 
 
 

First Published: Sunday, April 1, 2012, 14:29


comments powered by Disqus