फिरायला जायचेय... चला आंबा जंगलात.. - Marathi News 24taas.com

फिरायला जायचेय... चला आंबा जंगलात..

www.24taas.com, कोल्हापूर 
 
कोल्हापूरातील आंबा परिसर हा पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येतो आहे. शुद्ध हवा, घनदाट वृक्ष, पक्षांचा चिवचिवाट यामुळं पर्यटक आकर्षित होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या या ठिकाणाहून सुर्योदय आणि सूर्यास्त अनुभवणे पर्यटकांना भुरळ घालते.
 
कोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावर आंबा हे पर्यटनस्थळ विकसित होतं आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश, शुद्ध हवा, घनदाट वृक्ष, विविध पक्षांचा वावर आणि वेलींनी वेढलेले आंब्याचे जंगल पर्यटकांना साद घालतं. या परीसरात गवा सारखे प्राणीही आढळतात. जंगलाचं सौदर्य अनुभवण्यासाठी निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. या परिसरात दुर्मीळ औषधी वनस्पतीही पहायला मिळतात. पर्यावरण अभ्यासकही या भागाचं महत्व अधोरेखीत करतात.
 
पर्यटकांना या भागात राहण्याची आणि जंगलात मुक्तपणे फिरण्याची सोय आहे. अगदी विशालगडापर्यंत जाता येते. या परिसरातला चहाचा मळा हा देखील पर्यटकांसाठी औत्सुक्याचा विषय़ ठरतो आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, April 1, 2012, 18:27


comments powered by Disqus