Last Updated: Monday, April 2, 2012, 12:02
www.24taas.com, सांगली हायकोर्टानं बैलगाडीच्या शर्यतीला चाप लावल्यानंतर सांगली जिल्ह्यात या शर्यतसाठी नवी शक्कल लढवण्यात आली आहे. चक्क अल्पवयीन मुलांना गाडीला जुंपून शर्यती भरवण्यात आल्या. बक्षिसांचं आमिष दाखवून या चिमुरड्यांना शर्यतीत बैलासारखं पळवण्यात आलं.
सांगली जिल्ह्यातल्या बेडग गावातली. लहान मुलांना बैलगाड्यांना जुंपून त्यांना शर्य़तीत पळवलं जातं हायकोर्टानं बैलगाड्यांच्या शर्यतींवर सरसकट बंदी आणल्यानंतर बेडग गावातल्या लोकांनी आता लहान मुलांनाच बैलगाडीला जुंपायला सुरुवात केलीये. अगदी दहा -बारा वर्षांच्या मुलांना बक्षिसाच्या अमिषापोटी पळवलं जातयं. तेही रोजरोसपणं....कोवळी मुलं बैलगाडीला जुपणा-या महाराष्ट्राची वाटचाल आता तालिबानकडे झाली आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे.
या प्रकरणी महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री वर्षा गायकवाडांशी संपर्क साधला असता याप्रकरणी चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं.
First Published: Monday, April 2, 2012, 12:02