Last Updated: Monday, April 2, 2012, 19:10
www.24taas.com, कोल्हापूर 
कोल्हापुरकरांना आज वादळी वाऱ्यासह पावसानं चांगलंच झोडपलं. संध्याकाळच्या सुमारास पावसानं शहरात जोरदार हजेरी लावली. शहराच्या अनेक भागात गाराही पडल्या. ऐन एप्रिलच्या सुरुवातीलाच आलेल्या या अवकाळी पावसामुळं कोल्हापुरकरांची एकच तारांबळ उडाली.
पावसाचा जोर एवढा जास्त होता, की त्यामुळं अनेक ठिकाणी झाडंही उन्मळून पडली. अनेक भागांत गारांचा अक्षरशः सडा पडला. ऐन उन्हाळ्यात या अवकाळी पावसानं गारांसह जोराची हजेरी लावल्यानं कोल्हापुरकरांची मात्र मोठी तारांबळ उडाली.
राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. सांगली, सातारा आणि कोल्हापूर या शहरात तर सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक आलेल्या सरींनी सामान्यांची तारांबळ उडाली.
First Published: Monday, April 2, 2012, 19:10