Last Updated: Tuesday, April 3, 2012, 15:28
www.24taas.com, पुणे पोलिसांच्या उचलेगिरीचा अजब प्रकार पुण्यात उघडकीला आलाय. कोथरुडमधल्या एका तरुणाची बाईक कुठलीही शहानिशा न करता पोलिसांनी उचलून नेली.
हा प्रकार घडला तेव्हा पोलिसांसोबत एक आरोपीही होता. या आरोपीने दाखवलेली बाईकच पोलिस घेऊन गेले. अविनाश देशमुख नावाच्या तरुणाची ही बाईक आहे. ही गाडी पोलिसांनीच उचलल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून त्याच्या लक्षात आलं.
मात्र त्यापूर्वीच त्यानं अलंकार पोलीस चौकीत गाडी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनीच स्वतःच त्याला गाडी सापडल्याची माहिती दिली. या प्रकारामुळं पोलिसांच्या भूमिकेबाबत गूढ वाढलंय.
First Published: Tuesday, April 3, 2012, 15:28