Last Updated: Tuesday, April 3, 2012, 16:20
www.24taas.com, कोल्हापूर 
कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार सदाशीवराव मंडलीक यांच्यात पुन्हा जुंपली आहे. मुश्रीफ कोल्हापुरातल्या अवैध धंद्यांचे सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप खासदार सदाशीवराव मंडलीक यांनी केला आहे.
हसन मुश्रीफ मटक्याच्या धंद्याशी संबधित असल्याचा आरोपही मंडलीक यांनी केला आहे. ज्या मुश्रीफांचा अवैध धंद्यांना आशीर्वाद आहे. त्यांना वेगवेगळ्या समित्यांवर कसं घेतलं जातं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कोल्हापुरच्या रस्ते प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असतानाही पालकमंत्री हर्षवर्धन पाटील गप्प का आहेत असा सवाल मंडलीकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हसन मुश्रीफ आणि सदाशीवराव मंडलिक यांच्यात खडाजंगी होणार हे मात्र निश्चित मात्र त्यामुळे कोल्हापूरकर यात भरडले जाण्याची शक्यता आहे.
First Published: Tuesday, April 3, 2012, 16:20