Last Updated: Saturday, November 19, 2011, 12:05
झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर

कोल्हापूर - मुंबई ही किंगफिशर कंपनीकडून दिली जाणारी विमानसेवा आजपासून बंद करण्यात आली. यामुळं उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर इतर कंपन्यांमार्फत पुन्हा विमानसेवा सुरू करण्यासाठी एमआयडीसीनं प्रयत्न सुरु केले आहेत.
कोल्हापूरचा सध्या झपाट्यानं विकास सुरू आहे. यात कनेक्टेव्हिटीचाही मोठा वाटा आहे. मात्र आता विमानसेवा बंद झाल्यानं उद्योजकांचा वेळ वाया जाणार आहे. कारण मुंबईहून कोल्हापूरला दररोज ६० प्रवासी येतात तर किमान ४० प्रवासी परतीचा प्रवास करतात कोल्हापूर हा मार्ग महत्वाचा असल्यानं त्यावर पुन्हा विमानसेवा सुरू करण्यासाठी एमआयडीसीनं प्रयत्न सुरू केले. उद्योगांच्या वाढीसाठी विमानसेवा गरजेची असल्यानं हा मार्ग पुन्हा लवकर सुरू करणं गरजेचं आहे.
First Published: Saturday, November 19, 2011, 12:05