पुण्यात तरुणाची आत्महत्या - Marathi News 24taas.com

पुण्यात तरुणाची आत्महत्या

www.24taas.com, पुणे

पुण्यात अलका टॉकीज चौकाजवळ असलेल्या भारती विद्यापीठ भवन इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून एका तरुणानं उडी मारून आत्महत्या केली आहे. नवनाथ धानेपकर असं या मृत तरुणाचं नाव आहे.
 
भारती विद्यापीठ भवन इमारतीत असलेल्या फॅमिली कोर्टात नवनाथ आला होता. घटस्फोटाच्या वादातून नवनाथने आत्महत्या केल्याचा संशय आहे. मात्र अजूनही आत्महत्येचं खरं कारण समजू शकलं नाही.
 
मृत तरूणा हा कोर्टात आला होता. मात्र कोर्टातून बाहेर आल्यानंतर तो भारती विद्यापीठ भवनाच्या इमारतीवर गेला. आणि तेथील  ९व्या मजल्यावरून त्याने उडी मारली. पोलीस  पुढील तपास करीत आहेत.
 
 
 
 

First Published: Thursday, April 5, 2012, 14:05


comments powered by Disqus