Last Updated: Thursday, April 5, 2012, 16:09
www.24taas.com, पुणे मावळ गोळीबार प्रकरणी न्यायलयीन कोठडीत टाकलेल्या ४८ शेतक-यांना जामीन मंजूर झाला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाने साडेसात हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली आहे.
४८ शेतक-यांना पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी बोलवून अटक केली होती. आणि त्यानंतर त्यांची १५ दिवसांच्या न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.या शेतक-यांनी अचानक होणारी अटक टाळण्यासाठी जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती.
संबंधित आणखी बातम्या 
मावळ पोलिसांची अरेरावी वाढतेय?मावळ गोळीबारप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा वेग वाढवला आहे. शेतकऱ्यांना चौकशीसाठी बोलावून अचानक अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. पोलिसांच्या या अटकसत्रामुळे मावळातील शेतकरी धास्तावले आहेत.
.
------------------------------------

मावळमध्ये पोलिसांच्या अटकसत्राने शेतकरी धास्तावलेमावळ गोळीबारप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा वेग वाढवलाय.. शेतक-यांना चौकशीसाठी बोलावून अचानक अटक करण्याची पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.. पोलिसांच्या या अटकसत्रामुळे मावळातील शेतकरी धास्तावले आहेत.
.
------------------------------------
First Published: Thursday, April 5, 2012, 16:09