पुण्यात चुकून गोळीबार, ३ जखमी - Marathi News 24taas.com

पुण्यात चुकून गोळीबार, ३ जखमी

www.24taas.com, पुणे
 
पोलिसांच्या स्टेनगनमधून चुकून गोळीबार झाल्याने तीनजण जखमी झाल्याची घटना पुण्यात घडलीय. पुण्यातल्या भवानी पेठेतल्या अंबिका अमृततुल्य या हॉटेलमध्ये ही घटना घडलीय. चहा पिण्यासाठी इथं आलेल्या बीट मार्शल पोलिसाच्या हातून ही घटना घडलीय.
 
 
हातातून पडलेली स्टेनगन पकडण्याच्या प्रयत्नात अचुकून ट्रिगर दाबला गेल्याने ही दुर्दैवी घटना घडलीय. खाली पडली आणि त्यातून गोळ्या झाडल्या गेल्या.
 
काही समजण्याचा आत  गोळीबार झाला. आम्हांला सुरूवातीला फटाके वाजण्याचा आवाज वाटला, परंतु, त्या ठिकाणी आई ग, अरे बाप रे असे  नंतर गोळीबार झाल्याचे लक्षात  आल्याने आम्ही त्या ठिकाणाहून पळ काढल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

First Published: Thursday, April 5, 2012, 21:12


comments powered by Disqus