Last Updated: Saturday, April 7, 2012, 18:31
www.24taas.com, पुणे पुण्यात इडली खाल्ल्याने शाळेतील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. याप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शाळा प्रशासन हादरून गेले आहे.
इडली खाल्ल्यानंतर शाळेतील मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. पुण्यातल्या पर्वती पायथा परिसरात महापालिकेच्या गावडे शाळेतील मुलांना इडलीतून विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. माधान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना इडली देण्यात आली. त्यानंतर उलट्या आणि जुलाबांचा त्रास सुरु झाल्यानं काही विद्यार्थ्यांना पुना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.
First Published: Saturday, April 7, 2012, 18:31