कर्जामुळे ६ महिन्याचा मुलीलाही पाजले विष - Marathi News 24taas.com

कर्जामुळे ६ महिन्याचा मुलीलाही पाजले विष

www.24taas.com, सांगली
 
डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा आणि त्यातच कुटुंबात उडणारे खटके याला कंटाळून सांगलीच्या माळवाडीतल्या कुंभार कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कुटुंबातल्या नवरा बायकोनं स्वःत विष पिऊन तीन मुलींनाही विष पाजलं आहे.
 
कर्जाचा बोजा एवढा असह्य झाला की दांपत्यानं सहा महिन्याच्या चिमुरड्य़ा मुलीलाही विष पाजण्यास मागं पुढं पाहिलं नाही. राजेंद्र कुंभार आणि आशाराणी कुंभार अशी विष प्यायलेल्या दांपत्याचं नाव आहे.
 
तर संस्कृती, समृद्धी आणि उन्नती अशी तीन मुलींची नावं आहेत. विष प्यायल्यानं गंभीर झालेल्या पाचही जणांवर आयसीयूत उपचार सुरु आहेत. पाचही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जामुळे संपूर्ण कुटूंबाने आत्महत्येचा मार्ग स्विकारला आहे.
 
 
 
 
 

First Published: Tuesday, April 10, 2012, 17:07


comments powered by Disqus