पुलंच्या घरी चोरी, चोर पुस्तके पाहून फिरले माघारी! - Marathi News 24taas.com

पुलंच्या घरी चोरी, चोर पुस्तके पाहून फिरले माघारी!

www.24taas.com, पुणे
दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे पुण्यातील घर फोडण्याचा धक्कादायक प्रयत्न मंगळवारी उघड झाला असून मात्र, आतल्या कपाटांमध्ये पुल आणि सुनिताबाईंच्या पुस्तकांशिवाय काहीही न सापडल्याने चोरट्यांनी रित्या हातानेच पोबारा केला.
 
 
मंगळवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणानंतर पुलंचे नातू आणि या बिल्डिंगमधील शेजारी अश्विन सुधीर लोकरे यांनी तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील मालती माधव अपार्टमेंटमध्ये पु.ल. देशपांडे यांचा फ्लॅट आहे. पुल आणि सुनिताबाईंचे निधन झाल्यापासून ते कुलूपबंद अवस्थेत आहे. पुलंचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर असून, लोकरे कुटुंब वरील मजल्यावर राहते.
 
 
सोमवारी रात्री मॅच पाहिल्यानंतर लोकरे कुटुंबीय झोपी गेले. मंगळवारी सकाळी पुलंच्या फ्लॅटचा कोयंडा चोरट्यांनी तोडल्याचे आणि लॅचही तुटल्याचे निदर्शनास आले. बेडरूमधील कपाटेही उचकटण्यात आली होती. मात्र, त्यात केवळ पुस्तकेच होती. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

First Published: Tuesday, April 10, 2012, 20:22


comments powered by Disqus