Last Updated: Saturday, April 14, 2012, 16:52
www.24taas.com, कोल्हापूर कोल्हापूरमध्ये हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी बांधलेल्या खासबाग मैदानात या स्पर्धा पार पडणार आहेत. खासबाग हे जगातलं पहिलं कुस्तीचं खुलं मैदान आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने मैदानाची डागडुजी आणि स्वच्छता अभियान सुरु आहे. कुस्तीचा आखाडाही तयार करण्यात येतोय. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकतेचं वातावरण आहे. १९ ते २२ एप्रिल दरम्यान या स्पर्धा रंगणार आहेत.
दरम्यान, हिंदकेसरी कुस्तीसाठी महाराष्ट्रात तुल्यबळ मल्ल सापडत नाहीत. त्यामुळे हिंदकेसरीची गदा परराज्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तयारी नसल्यानं अनेक मल्ल मैदानात उतरण्यास तयार नाहीत, तर महाराष्ट्रातील मल्ल चांगली लढत देतील अशी आशा कुस्ती प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे.
First Published: Saturday, April 14, 2012, 16:52