Last Updated: Monday, April 16, 2012, 23:42
www.24taas.com, पुणे पुण्यात दारुच्या नशेत काही विद्यार्थ्यांनी तीन एटीएम फोडण्याचा पराक्रम केलाय. हडपसर परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी हे युवक दारुच्या नशेत गेले होते.
परंतु पैसे निघत नसल्याने रागाच्या भरात त्यांनी एटीएम मशीनला लक्ष्य करत तोडफोड केली. युनियन बँक, एक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक या तीन बँकांच्या एटीएमची त्यांनी तोडफोड केली. पंकज ढोले, संदेश राठोड आणि नकुल लोणकर अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहेत.
या तोडफोडीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन या युवकांना पकडले. पाठलाग करत असताना एक युवक गाडीवरुन पडून जखमी झाला आहे.
First Published: Monday, April 16, 2012, 23:42