Last Updated: Wednesday, April 18, 2012, 16:30
www.24taas.com, पुणे 
पुण्यातल्या भवानी पेठेतल्या मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेत जबरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्यानं साडे सतरा किलो सोनं, आणि सहा लाख ३४ हजारांची रोकड चोरुन नेली आहे.
मंगळवारी संध्याकाळी साडे सात वाजता ही घटना घडल्याची शक्यता आहे. याच वेळी मण्णपुरम गोल्डच्या शाखेचा सुरक्षा रक्षक अर्ध्या तासासाठी बाहेर गेला होता. त्याचवेळी ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या चोरट्यांनी या शाखेची डुप्लिकेट चावी करुन घेतली होती. त्या चावीच्या मदतीनंच चोरट्यांनी सोनं आणि रोकड लांबवली.
या शाखेतले संबंधित कर्मचारी आणि सुरक्षारक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
First Published: Wednesday, April 18, 2012, 16:30