मुलांना खेळासाठी कोणी पार्क देतं का? - Marathi News 24taas.com

मुलांना खेळासाठी कोणी पार्क देतं का?

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
 
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की बच्चे कंपनी वळते ती धमाल करण्याकडे. गल्लीत, मोकळ्या जागेत तर कधी पार्कमध्ये बच्चे कंपनी मजा करते. पण पिंपरी-चिंचवडमध्ये मुलांना पार्कमध्ये जावं की नाही असा प्रश्न पडला आहे. कारण शहरातल्या बहुतांश पार्कची दुरवस्था झाली आहे.
 
फरश्या फुटलेल्या. घसरगुंडीच्या पायऱ्याच गायब. सर्वत्र घाणीचं साम्राज्य. तर बहुतांश खेळायची सामग्री बिनकामाची. ही अवस्था आहे. पिंपरी-चिंचवडमधल्या पार्कची. उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चे मंडळी पार्कमध्ये धमाल करण्यासाठी येतात. पण पार्कमधली ही अवस्था पाहिल्यानंतर इथं खेळायला तरी कोण येणार हाच प्रश्न उपस्थित होतो आहे. शहरातल्या अनेक पार्कमध्ये असंच चित्र पहायला मिळतं आहे. दुसरीकडे पालिका मात्र पार्क चांगल्या स्थितीत असल्याचा दावा करते आहे. काही पार्कमध्येच अशी अवस्था असल्याचा पालिकेचा दावा आहे.
 
महापालिकेकडून या पार्कसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. पण पार्कमधल्या अशी अवस्था पाहिल्यानंतर हा खर्च नेमका कशावर केला जातो हाच खरा प्रश्न आहे. ऐन उन्हाळ्यात जर मुलांना या पार्कचा उपयोग होत नसेल तर या पार्कचा फायदा काय असा सवाल नागरिक करत आहेत.
 
 
 
 
 

First Published: Wednesday, April 18, 2012, 21:43


comments powered by Disqus