पुण्याच्या मेट्रो रेल्वेचे वाजले की बारा... - Marathi News 24taas.com

पुण्याच्या मेट्रो रेल्वेचे वाजले की बारा...

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
पुण्यातील मेट्रो प्रकल्प मार्च 2012 पर्यंत लांबणीवर पडला. महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिल्यानं मेट्रोच्या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळं आता निवडणुकांनंतर मार्चमध्ये नव्या सभागृहातच मट्रोचा विषय चर्चेला येणार आहे.
 
पुणे मेट्रोच्या कामाचा मुहूर्त आता मार्चपर्य़ंत लांबणीवर पडला. एलिव्हेटेड मेट्रोला पुणे महापालिकेनं परवानगी दिली होती. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीनं भूमिगत मेट्रोसाठी आग्रह धरला. मेट्रोचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी येणार होता. मात्र राष्ट्रवादीचे सदस्यचं सभागृहात गैरहजर राहिल्यानं हा प्रस्ताव पुढं ढकलण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली. आता मेट्रोचा प्रस्ताव मार्च 2012 मध्ये पालिका सभागृहात मांडला जाणार आहे.
 
मेट्रोबाबत राष्ट्रवादीच्या भूमिकेवर विरोधकांनी शंका उपस्थित केली. विरोधकांनी राष्ट्रवादीवर दुटप्पीपणाचा आरोप केला. पुण्यातल्या अनेक चांगल्या योजना वादात अडकल्यात. त्यात आता पुणे मेट्रोची भर पडली आहे.

First Published: Wednesday, November 23, 2011, 15:47


comments powered by Disqus