जेजुरीचं विश्वस्त व्हायचंय, ३० लाख लाच द्या - Marathi News 24taas.com

जेजुरीचं विश्वस्त व्हायचंय, ३० लाख लाच द्या

www.24taas.com, जेजुरी
 
जेजुरी देवस्थान ट्रस्टवर विश्वस्त म्हणून नियुक्तीसाठी लाच मागणाऱ्या धर्मादाय आयुक्तालयातल्या अधिकाऱ्याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. प्रभाकर सावंत असं या अधिकाऱ्याचं नावं आहे.
 
जेजुरी संस्थानच्या विश्वस्त पदाच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी तक्रारदारानं मुलाखतही दिली होती. विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षक प्रभाकर सावंत यांनी ३० लाखांच्य़ा लाचेची मागणी केली होती.
 
या मागणीवरुन तक्रारदारानं सावंत यांच्याबाबचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार केली. या तक्रारीवरुन एसीबीनं सापळा रचून सावंत यांना लाचेचा दोन लाखांचा हप्ता घेताना अटक केली आहे.
 
 
 

First Published: Thursday, April 19, 2012, 14:18


comments powered by Disqus