Last Updated: Friday, April 20, 2012, 15:14
www.24taas.com, कोल्हापूर कोल्हापुरात लाकू़ड व्यापारी अशोक बांदिवडेकर यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या खून छोटा राजनकडून करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चंदगड येथील बाजारपेठेत अशोक बांदिवडेकर यांचा आज शुक्रवारी सलूनमध्ये बसले होते. यावेळी दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले. याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया चंदगड पोलिस ठाण्यात सुरू होती. सूडसत्रातून हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मारेकरी गॅंगवॉरशी संबंधित आहेत काय, याचाही तपास करण्यात येत आहे.
First Published: Friday, April 20, 2012, 15:14