Last Updated: Thursday, November 24, 2011, 07:07
झी २४ तास वेब टीम, पुणेकॉमनवेल्थ घोटाळ्यातले प्रमुख आरोपी सुरेश कलमाडींना काँग्रेसनं पक्षातून निलंबित केलं असलं तरी कलमाडींच्या समर्थकांचं त्यांच्यावरील प्रेम कमी झालेलं दिसत नाही. पुणे महापालिकेच्या काँग्रेस गटनेत्याच्या दालनातील कलमाडींचा फोटो अजूनही काढण्यात आलेला नाही.
काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांच्या दालनात आजही कलमाडींचा फोटो जसाच्या तसा आहे. कलमाडींवर घोटाळ्याचे आरोप असले तरी ते सिद्ध झाले नसल्यानं त्यांच्या फोटो कायम ठेवणार असल्याचं समर्थक सांगतात. तर कलमाडींच्या घोटाळ्याचा महापालिका निवडणुकीत पक्षाला फटका बसेल असा आरोप कलमाडींचे पक्षांतर्गत विरोधक करतायेत.
देशात भ्रष्टाचाराविरोधात रण माजलेलं असताना घोटाळेबाज नेत्याची फोटोपूजा करुन काँग्रेस नेते जनतेला कोणता संदेश देतायेत असा सवाल उपस्थित केला जातोय.
First Published: Thursday, November 24, 2011, 07:07