भाजप कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या - Marathi News 24taas.com

भाजप कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या

www.24taas.com, सांगली 
 
 
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये भाजप युवामोर्चाच्या शहराध्यक्ष शंकर गवंडी यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
 
 
शहराध्यक्ष शंकर गवंडी यांची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. आज पहाटे सांगली-इस्लामपूर रोडवर अज्ञात मारेक-यांनी गवंडी यांची हत्या केली. या हत्येमुळे इस्लामपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
 
 
गृहमंत्र्यांच्या सांगली जिल्ह्यात आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर शहरात एका पक्षाच्या शहरअध्यक्षाची हत्या झाल्यामुळे राजकीय वातावरण तापल आहे. सांगलीत पोलिसांचा धाक  नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. गृहमंत्र्याच्या जिल्ह्यात अशा घटना घडत असतील तर राज्यात काय परिस्थिती असेल. कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
 
 
व्हिडिओ  पाहा...
 

First Published: Saturday, April 21, 2012, 14:34


comments powered by Disqus