माणसांना मिळतेय जनावरांच खाणं - Marathi News 24taas.com

माणसांना मिळतेय जनावरांच खाणं

www.24taas.com, श्रीरामपूर
 
श्रीरामपूर इथल्या भारतीय खाद्य निगमच्या गोदामाची  अवस्था अत्यंत वाईट आहे. रेशन दुकांनांना आणि शालेय पोषण आहारासाठी धान्यपुरवठा होतो. मात्र भारतीय खाद्य निगमनं घेतलेलं हे गोदाम जुनं आहे. पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी गोदामाच्या खालून व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात गटारं तुंबल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसानं झालं होतं.
 
इतकचं काय या धान्यात कुत्रे, मांजरांची विष्ठाही मिसळली आता तेच अन्न लोकांना खायला दिलं जाणार आहे. जे धान्य जनावरं खाऊ शकत नाही तेच अन्न गरीबांच्या माथी मारलं जातं आहे. विशेष म्हणजे याची देखभाल करण्यासाठी केवळ पाचच कर्मचारी आहेत. त्यातलेही बहुतेक कर्मचारी गैरहजर असतात. वारवांर सांगूनही गोदामाची दुरुस्ती होत नाही. मार्च महिन्यातली केवळ २७० पोती खराब झाल्याचं उत्तर अधिऱ्यांनी दिलं आहे.
 
खराब धान्य वितरीत केलं नसल्याचं अधिकारी सांगत असले तरी धान्य खराब होतचं कसं हा प्रश्न आहे. मुळात अनेक लोक अर्धपोटी रहात असताना गोदामातले धान्य खराब होतं आणि त्यावर काही कारवाई होत नाही हे संतापजनक आहे.
 
 
 

First Published: Sunday, April 22, 2012, 00:06


comments powered by Disqus