Last Updated: Tuesday, April 24, 2012, 13:34
www.24taas.com, पुणे 
अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आज हजारो आंब्यांचा नैवैद्य अर्पण करण्यात आला. अतिशय आकर्षक पद्धतीनं नैवैद्य म्हणून अर्पण केलेल्या आंब्यांची आरास करण्यात आली आहे. अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरामध्ये सुमारे ११००० आंब्यांची सजावट करण्यात आली आहे.
दरवर्षी अक्षय्य तृतीयाच्या शुभमूहर्तावर दगडूशेट गणपती मंदिरात हापूस आंब्यांची आरास केली जाते. आजच्या शुभ दिवशी लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रिघ लागली आहे. नैवेद्य दाखवलेले हापूस नंतर भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येतात.
अक्षय्य तृतीयेचा मुहुर्त हा शुभ मानला जातो. त्यामुळे दरवर्षी गणपती मंदिरात अशीच आंब्यांची आरास केली जाते. त्यामुळे पुणेकर मोठया प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतात.
First Published: Tuesday, April 24, 2012, 13:34