'द न्यु इंडिया वुमन' जावळखेडच्या सरपंचांना - Marathi News 24taas.com

'द न्यु इंडिया वुमन' जावळखेडच्या सरपंचांना

www.24taas.com, मुंबई
 
'द न्यु इंडिया वुमन' या विषयावर मुंबईत कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री तर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला.
 
यावेळी महाष्ट्रातील जावळखेड या गावातील महिला सरपंच बबई साठे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या गावात केलेल्या त्यांच्या कार्याविषयी हा गौरव करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांसोबत बॉलीवूडच्या कलाकारांनीही सहभाग घेतला होता.
 
अहमदनगर मधील जावळखेड गावच्या महिला सरपंच या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. महिला सरपंच बबई साठे या निरक्षर आहेत. मात्र त्यांनी आजवर त्यांचा गावातील प्रत्येक बाळंत झालेल्या महिलेची योग्य प्रकारे शुश्रुषा केली आहे. आणि यासाठीच त्यांना ह्या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, April 24, 2012, 15:44


comments powered by Disqus