Last Updated: Friday, November 25, 2011, 08:39
झी २४ तास वेब टीम, अहमदनगर अहमदनगरमध्ये लष्कराच्या एमआयआरसीच्या प्रशिक्षण केद्रातील जवानांचा पासिंग परेड सोहळा उत्साहात पार पडला. १६२ जवानांनी दिमाखदार सोहळात लष्कराच्या यांत्रिकी पायदळात प्रवेश केला. या जवानांनी अनेक महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलंय. एमआयआरसीच्या 'अखौरा ड्रिल स्क्वेअर' या भव्य मैदानात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी जवानांचे कुटुंबिय आणि लष्कराचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. ब्रिगेडीयर जॉयदीप भाटी यांनी जवानांकडून मानवंदना स्वीकारली.
First Published: Friday, November 25, 2011, 08:39