कोयनेत यशस्वी लेक टॅपिंग - Marathi News 24taas.com

कोयनेत यशस्वी लेक टॅपिंग


www.24taas.com, कोयना

 
 
कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार पाहायला मिळाला. केवळ आठ सेकंदात पाण्यातच्या खाली स्फोट घडवून आणण्यात आला. त्यामुळे जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यात अभियंते यशस्वी झाल्याने इतिहासातील हे सोनेरी पान लिहिले गेले आहे.
 
 
दोन वर्षाचे परिश्रम आणि १० कोटी रुपये खर्च करुन हे लेक टॅपिंग करण्यात  आले. या लेक टॅपिंगमुळे वीज निर्मितीत आहे तेवढीच राहणार असली तरी सिंचनासाठी २०टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे.  जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत. दोन वर्षाचे परिश्रम आणि १० कोटी रुपये खर्च करुन हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे. या लेक टॅपिंगमुळे वीज निर्मिती आहे तेवढीच राहणार असली तरी सिंचनासाठी २०टीएमसी पाणी मिळणार आहे.
 
 
कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात आज बुधवारी करण्यात आलेले लेकटॅपिंग यशस्वी झाले. सकाळी १० वाजून ५६ मिनिटांनी ब्लास्ट करून हे लेकटॅपिंग यशस्वी करण्यात आले. या प्रयोगामुळे दर वर्षी ११८५ दशलक्ष युनिट एवढी जादा वीजनिर्मिती होणार आहे. आशिया खंडातील या दुसऱ्या लेकटॅपिंगचे आकर्षण राज्यभर होते. लेकटॅप आशिया खंडातील दुसरा आहे. पहिले लेकटॅपिंग १३ मार्च १९९ ला कोयना जलाशयात झाले होते. हा लेकटॅप पहिल्या लेकटॅपच्या तुलनेत पाण्यातील दुप्पट खोलीवर घेण्यात आला आहे. या लेकटॅपनंतर कोयना धरणातून २० टीएमसी पाणी पूर्वेकडे सिंचनासाठी सोडता येणार आहे, तर ताकारी टेंभू, म्हैसाळ, या उपसा सिंचना योजनांद्वारे दुष्काळी भागाला पाणी पुरवले जाणार आहे.
 
 
लेकटॅपिंग करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या वेळी जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळूक, खासदार उदयनराजे भोसले, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व मान्यवर उपस्थित होते. लेकटॅपिंग होताच अधिजल भुयारातून वेगात पाणी खळाळले. कोयना जलविद्युतप्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याच्या लेकटॅपिंग यशस्वी झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे.
 
 
व्हिडिओ पाहा...
 

 
 
संबंधित आणखी बातमी
 
कोयनेत आज लेकटॅपिंगचा थरार

कोयनेत आज लेकटॅपिंगचा थरार
कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार होणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत. दोन वर्षाचे परिश्रम आणि १० कोटी रुपये खर्च करुन हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे. या लेक टॅपिंगमुळे वीज निर्मितीत आहे तेवढीच राहणार असली तरी सिंचनासाठी २०टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत.

First Published: Wednesday, April 25, 2012, 12:31


comments powered by Disqus