Last Updated: Wednesday, April 25, 2012, 17:31
कैलास पुरी, www.24taas.com, पुणे विविध फळं, भाजी आणि मसाल्यांवरचं नियमन रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं शेतकरी संघटनांनी स्वागत केलंय. पण सरकारन हा निर्णय घेताल्यानंतर परत त्यावर हरकती मागावाल्यात. त्याला संघटनांनी जोरदार विरोध केलाय. त्याचबरोबर आंदोलनाचा इशारा दिलाय.
आंबा, मोसंबी, संत्री, चिक्कू अशी जवळपास तीस फळं आणि कांदा,बटाटा, टॉमेटो, आलं, लसूण, मिरची, पालेभाज्या यावरचं नियमन रद्द करण्याचा निर्णय सरकारनं नुकताच घेतलाय. त्यामुळे शेतक-यांना माल कृषी बाजार उत्पन्न समितीत घेऊन न जाता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. या निर्णयाचं शेतकरी संघटनांनी स्वागत केलंय. पण सरकारनं या निर्णयावर हरकती आणि सूचना मागवल्यात. त्याला संघटनांनी जोरदार विरोध केलाय. हा निर्णय सरकारनं बदलू नये, असा इशारा संघटनांनी दिलाय.
सरकारनं जवळपास ४५ उत्पादनांवरचं नियमन रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. नियमन रद्द झाल्यामुळं शेतक-यांचा प्रचंड फायदा होणार आहे. हा निर्णय फायद्याचा असल्यानं सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्यात.
First Published: Wednesday, April 25, 2012, 17:31