कोल्हापुरात शिवसेनेचं आंदोलन - Marathi News 24taas.com

कोल्हापुरात शिवसेनेचं आंदोलन

www.24taas.com, कोल्हापूर
 
कोल्हापुरात विभागीय जात पडताळणी कार्यालयात शिवसेनेनं आंदोलन केलं. लाच घेतल्याशिवाय कामे होत नाहीत, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी कार्यालयाचे नामकरण लाच पडताळणी कार्यालय असं केलं.
 
तिथल्या अधिका-यांच्या टेबलावरच दारुच्या बाटल्या ठेवल्या. या कार्यालयावर लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी आत्तापर्यत चार वेळा धाड टाकून कर्मचा-यांना अटक केलीये. तरीही या कार्यालयातली परिस्थिती बदलली नाही. नागरिकांकडून कामे मार्गी लावण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप पालक आणि विद्यार्थ्यांनी केलाय.
 
दोन-दोन वर्षे जात पडताळणीची कामे रखडवली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेनं या कार्यालयावर धडक मारली.

First Published: Wednesday, April 25, 2012, 22:55


comments powered by Disqus