राज ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी - Marathi News 24taas.com

राज ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी

www.24taas.com, पुणे
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या  परखड बोलण्यासाठी जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच त्यांच्या मिश्कील बोलण्यासाठीही प्रसिद्ध   आहेत... पुण्यात आज त्यांच्या मिश्कील बोलण्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.  निमित्त   होतं  चिंटू या चित्रपटाच्या म्युझिक लाँचचं.
 
राज यांना  चिंटू या चित्रपटाच्या म्युझिक लाँचला यायला जवळ पास दीड तास उशीर झाला. हा उशीर का झाला सांगताना त्यांनी  त्यांच्याच खास शैलीती उत्तर दिलं. राजकारणी असल्यामुळे उशिर केला नाही हे त्यांनी त्यांच्या खास शैलीत सांगितलंच, पण डोक्यात हवा गेली नाही हे ही ते सांगायला विसरले नाहीत.चारुहास पंडित यांनी काही काळ सकाळ सोडून लोकसत्तातही ‘चिंटू’ मालिका चालवली. त्यांच्या या बदलाचाही राज ठाकरे यांनी उलेख केला आणि मी मात्र परत कुण्या पक्षात जाणार नाही हे मिश्किलपणे सांगितलं..
 
बोलण्याच्या ओघात राज ठाकरे यांनी त्यांचा ‘घंटा’ हा आवडता शब्द भाषणात वापरला, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली खरी; पण तो शब्द का येतो त्याच कारणही सांगितलं आणि उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकला. महेश मांजरेकर यांच्या ‘काकस्पर्श’ या चित्रपटाचा उलेखही राज यांनी करत उपस्थितांना चांगलंच हसवलं. राज ठाकरे हे उशिरा जरी आले असले तरी त्यांनी अखेर त्यांच्या खास शैलीत भाषण करत वातावरणात रंग भरले
 

 

First Published: Wednesday, April 25, 2012, 23:19


comments powered by Disqus