राहुल गांधी वाईट फलंदाज, विकेट पडणार - Marathi News 24taas.com

राहुल गांधी वाईट फलंदाज, विकेट पडणार

www.24taas.com, सांगली
 
राहुल गांधी हे लाईन आणि लेन्थ नसलेले फलंदाज असल्यामुळे ते लवकर आऊट होत आहेत, अशी टिप्पणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी केली.  सांगली जिल्ह्यात दुष्काळाचा दौऱ्यावर आले असता ते बोलत होते.
 
अनुशेषाचा मुद्दा पुढे करुन आघाडी सरकार आपली कार्यक्षमता लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यामुळे राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर विनोद तावडे यांनी तोंडसुख घेतलं आहे.
 
काँग्रेस सरचिटणीस राहूल गांधी २ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे खुद्द विमानतळावर दाखल झाले होते. राहुल गांधी आज मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार असून युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
 
 
 

First Published: Friday, April 27, 2012, 13:42


comments powered by Disqus