Last Updated: Saturday, November 26, 2011, 07:41
झी २४ तास वेब टीम, पुणे २६/११ च्या घटनेला तीन वर्षं सरली. याच २६/११ च्या निमित्तानं पुणे पोलिसांनी मरणोत्तर नेत्रदानाचा कौतुकास्पद संकल्प केलाय. पुण्यातल्या दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या १२६ पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी हा निर्णय घेतलाय. त्यासाठी त्यांनी फॉर्म्सही भरुन दिलेत.
सामान्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तत्पर आहेतच. पण त्याहीपेक्षा पुढे जात मानवता आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीनं दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हे पाऊल उचललंय.
२६/११ च्या निमित्तानं देशभर मेणबत्त्या पेटतील.... पण त्याहीपेक्षा देशातल्या जनतेचा विकासासाठी प्रत्यक्षात केले जाणारे प्रयत्न महत्त्वाचे. २६/११ च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना डोळ्याच्या कडा नुसत्या ओल्या करण्यापेक्षा गरजवंतांना दृष्टीदानाचा संकल्प करणं हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
First Published: Saturday, November 26, 2011, 07:41