पुण्यात दुर्मिळ मासे, पक्ष्यांचं प्रदर्शन - Marathi News 24taas.com

पुण्यात दुर्मिळ मासे, पक्ष्यांचं प्रदर्शन

www.24taas.com, पुणे
 
जगभरातील दुर्मिळ तसंच देखणे पक्षी तसंच मासे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. 3 पॉज संस्थेच्या वतीनं हे अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलंय.
 
छान छान मासे...सुंदर सुंदर पक्षी...काही गोड्या पाण्यातले मासे तर काही खा-या पाण्यातील... लायन फिश... ऑक्टोपस... जेली फिश... स्टार फिश... पाळीव माश्यांच्या अशा कितीतरी प्रजाती... शंभराहून जास्त प्रजातींचे पक्षीही याठिकाणी आहेत. पिंचेस, मकाऊ, हँटेम बर्ड.... नानाविध रंगाचे, नानाविध वैशिष्ट्यांचे हे पक्षी आणि मासे... टीव्ही चॅनल्सवरून पहायला मिळणारी ही अनोखी दुनिया पुण्यामध्ये प्रत्यक्षात अवतरली आहे. पाळल्या जाणा-या माशांची तसंच पक्ष्यांची माहिती सामान्य नागरिकांनी व्हावी, आणि त्यातून पशू-पक्ष्यांविषयीचं प्रेम वाढावं यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलंय.
 
प्राण्या-पक्ष्याचं फोटो प्रदर्शनही याठिकाणी लावण्यात आलंय. काही शिल्पाकृतीही आहेत. मासे तसंच पक्षी पाळण्याचा छंद शास्त्रीय पद्धतीनं जोपासण्याचं मार्गदर्शनही याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलंय. म्हात्रे पुलाजवळ नदीकाठच्या रस्त्यावर हे प्रदर्शन सुरू आहे. छंदिष्टांकडील हा अनोखा खजिना येत्या 1 मे पर्यंत पाहण्यासाठी खुला आहे.

First Published: Friday, April 27, 2012, 17:37


comments powered by Disqus