Last Updated: Saturday, April 28, 2012, 09:23
www.24taas.com, माण काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाचा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जासी गावाला भेट दिली. पहिल्याचे भेटीत गावकऱ्यांनी राहुल यांनी प्रश्न केला, आमच्या गावात पाणी का नाही? या दौ-यातून दुष्काळग्रस्तांसाठी कोणतल्या ठोस उपाययोजना होणार याकडं लक्ष लागले आहे. केवळ दिखाऊ दौरा नको ठोस उपाययोजना हव्यात ,अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे खासदार उदनयराजेंनी व्यक्त केली आहे.
मुंबई दौ-यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी शनिवारी सातारा जिल्ह्यातल्या भीषण दुष्काळ पडलेल्या माण गावाचा दौरा करणार आहेत. राहुल गांधी माण तालूक्यात येत असून तलावाची पाहणी, शेततळे दुष्काळाने करपलेल्या डाळिंबाच्या बागा याची पाहणी ते करतील. रोजगार हमी योजनेतल्या विहिंरींची पाहणी करून चारा डेपोलाही ते भेट देणार आहेत. त्यांना परिस्थिती दाखवू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दौरे करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांसाठी उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे असं राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलय.राहुल गांधींच्या दुष्काळी भागातल्या दौ-यावरून विरोधकांनी राहुल गांधींना ठोस उपाययोजना करण्याचा सल्ला दिलाय. दुष्काळी भागासाठी सरकार पैसे देते ते जातात कुठं असा विरोधकांचा सवाल आहे. राहुल गांधी यांच्या दौ-यानं दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे. सतत दुष्काळानं होरपळणा-या या भागाला काही पॅकेज जाहीर होणार काय याकडं जनतेचं लक्ष लागले आहे.
First Published: Saturday, April 28, 2012, 09:23